चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता बीवायडीचा पोर्टफोलिओ डॉल्फिन ईव्ही बेस्टसेलिंग मॉडेल आहे. ही इलेक्ट्रिक हॅचबॅक २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आता पुढील वर्षी याचे पहिले मोठे अपडेट मिळणार आहे.
चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटो आणि डेटामध्ये त्याच्या फेसलिफ्ट मॉडेलबद्दल काही तपशील समोर आले आहेत.
जुन्या मॉडेलपेक्षा २०२६ बीवायडी डॉल्फिनच्या एक्स्टरनल डिझाइनमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. बीवायडीने साध्या बंद ग्रिलचा पर्याय निवडला आहे आणि समोर लहान बंपर इन्टेकची निवड केली आहे.
सध्याच्या बीवायडी डॉल्फिन ईव्हीमध्ये दोन पॉवरट्रेन पर्याय आहेत. बेस व्हेरियंट ९४ एचपी पॉवर जनरेट करतो, तर टॉप-व्हेरियंट २१० एचपी पॉवर जनरेट करतो. हे दोन्ही पॉवरट्रेन पर्याय २०१६ बीवायडी डॉल्फिनसाठी कायम ठेवले जातील. मात्र, नव्या मॉडेलमध्ये अतिरिक्त मिड-स्पेक पॉवरट्रेन मिळेल, जी १७४ एचपी पॉवर जनरेट करेल.