BYD eMAX 7 set for launch tomorrow: बीवायडी ईमॅक्स ७ उद्या भारतीय बाजारात लॉन्च होत आहे. ही कार बाजारात दाखल होताच मोठी पसंती मिळवेल, असा कंपनीचा विश्वास आहे.
(1 / 4)
चीनची इलेक्ट्रिक वाहन कंपनी उद्या आपली नवी कार ईमॅक्स ७ भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे, ज्याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.
(2 / 4)
बीवायडी ईमॅक्स ७ चे बुकिंग ५१ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटसह सुरू झाले. पहिल्या १००० ग्राहकांना ७ किलोवॅटचा चार्जर मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले. नवीन एमपीव्हीची डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे.
(3 / 4)
बीवायडी ई ६ ची एक्स शोरूम किंमत सध्या २९.१५ लाख रुपये आहे. बीवायडी ईमॅक्स ७ ची किंमत जवळपास समान असण्याची शक्यता आहे. नवीन इलेक्ट्रिक एमपीव्हीची एक्स-शोरूम किंमत ३० लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
(4 / 4)
लाँचिंगच्या वेळी कोणताही थेट स्पर्धक नसला तरी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि मारुती सुझुकी इनविक्टो सारख्या प्रस्थापित एमपीव्हीसाठी ईमॅक्स ७ इलेक्ट्रिक पर्याय म्हणून काम करू शकते.