Hyundai Verna: ह्युंदाई वेरना ही मध्यम आकाराची सेडान आर सेगमेंटमधील एक उत्तम कार आहे. या महिन्यात या कारवर एकूण ५० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. वेरना सध्या त्याच्या सेगमेंटमधील एक स्टायलिश आणि भविष्यकालीन डिझाइनसह तयार करण्यात आली.
Honda City: होंडा सिटी ही आजही एक उत्तम सेडान कार पैकी एक आहे. या महिन्यात तुम्हाला या कारवर १.१४ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या कारमध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन आहे. याशिवाय यात हायब्रीड टेक्नोलॉजी आहे. या कारमध्ये ग्राहकांना चांगले फीचर्स मिळतात. होंडा सिटीची थेट स्पर्धा ह्युंदाई वेर्ना आणि स्कोडा स्लाव्हियाशी आहे.
Honda Amaze: कॉम्पॅक्ट सेडान कारच्या सेगमेंटमध्ये होंडा अमेझला खूप पसंती मिळाली. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास तुम्हाला १.१२ लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळेल.
Hyundai Aura: कॉम्पॅक्ट सेडान कारच्या यादीत ह्युंदाई ऑरा तरुणांना खूप आवडते. या महिन्यात तुम्हाला या कारवर ४८ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळेल. ही कार होंडा अमेझ आणि मारुती डिझायर सारख्या वाहनांशी थेट स्पर्धा करेल.