मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budhaditya Yog : बुध व सूर्याचे मिथुन राशीत संक्रमण; बुधादित्य योगाचा या ३ राशींना होईल लाभ, सुखसोयी वाढतील

Budhaditya Yog : बुध व सूर्याचे मिथुन राशीत संक्रमण; बुधादित्य योगाचा या ३ राशींना होईल लाभ, सुखसोयी वाढतील

Jun 08, 2024 01:02 PM IST
  • twitter
  • twitter
Budhaditya Yog : जूनमध्ये सूर्य आणि बुध मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. यामुळे ३ राशींच्या लोकांच्या सुखसोयीमध्ये वाढ होईल, जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलतात आणि एकाच राशीत दोन, तीन किंवा चार ग्रह एकत्र आल्याने ग्रहांचा योग-संयोग तयार करतात. ग्रहांच्या संयोगाने तयार होणारे योग केवळ लोकांच्याच नव्हे तर देश आणि जगाच्या जीवनावरही परिणाम करतात.
share
(1 / 6)

जूनमध्ये रवि, बुध, मंगळ आणि शुक्र राशी बदलणार आहे.  ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असल्याने सर्व राशींवर परिणाम होतो. या महिन्यात सूर्य आणि बुध दोघेही मिथुन राशीत प्रवेश करतील. मिथुन राशीत रवि आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होईल.
share
(2 / 6)

ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा अधिपती बुध १४ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधानंतर सूर्यदेव १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करत आहे. बुधाचे मिथुन राशीत संक्रमण झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना पैसा, सुख, करिअर आणि व्यवसायातून भरपूर फायदा होईल. 
share
(3 / 6)

वृषभ : शुक्रवार १४ जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळेल आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. यामुळे आर्थिक लाभ होईल आणि बुद्धिमत्ता वाढेल. नोकरी शोधणारे आणि व्यावसायिक या काळात भरपूर समृद्ध होतील.  
share
(4 / 6)

मिथुन : शुक्रवार १४ जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचा आशीर्वाद मिळतो. मिथुन राशीसाठी बुध हा पहिल्या आणि चौथ्या भावाचा अधिपती आहे. बुध संक्रमणामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता वाढेल, कामात फायदा होईल, नोकरीत पदोन्नती होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
share
(5 / 6)

सिंह : या राशीसाठी बुध द्वितीय व अकराव्या भावाचा अधिपती आहे. तुमच्या अकराव्या भावात बुधाचे संक्रमण होईल. सिंह राशीच्या व्यक्तींना बुध संक्रमणामुळे प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल, नोकरीत प्रगती, व्यवसाय विस्तार होईल आणि प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील. बुधाकडून तुमचा मान-सन्मान वाढेल.
share
(6 / 6)
सिंह : या राशीसाठी बुध द्वितीय व अकराव्या भावाचा अधिपती आहे. तुमच्या अकराव्या भावात बुधाचे संक्रमण होईल. सिंह राशीच्या व्यक्तींना बुध संक्रमणामुळे प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल, नोकरीत प्रगती, व्यवसाय विस्तार होईल आणि प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील. बुधाकडून तुमचा मान-सन्मान वाढेल.(Freepik)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज