ग्रहांच्या संक्रमणामुळे होणारे शुभ योग आणि राजयोग विविध राशीच्या जातकांवर मोठा प्रभाव पाडतात. त्याचप्रमाणे फेब्रुवारीमहिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध एकत्र येणार आहेत. कुंभ राशीत हा योग होणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांना भेटून शुभ राजयोग तयार करत आहेत. या राजयोगाचे नाव बुधादित्य राजयोग आहे, ज्याचा १२ राशींवर परिणाम होईल.
मेष :
मेष राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. या संयोजनामुळे व्यक्तीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीची नवी संधी मिळू शकते. या काळात व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळू शकते. नजीकच्या भविष्यात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
मिथुन :
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि बुधाची ही युती अनुकूल काळ सुरू करू शकते. या दरम्यान तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या कालावधीत तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. या काळात पूजा केल्याने मन शांत राहील. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास अनपेक्षितपणे वाढू शकतो. व्यापाऱ्यांना विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च कमी होऊन नवीन कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परदेशातून काम मिळू शकते.
कुंभ :
कुंभ राशीच्या व्यक्तींना रवि आणि बुध यांच्या संयोगाचा विशेष लाभ होईल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी संबंध दृढ होतील जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कार्यक्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कुंभ राशीच्या विवाहित लोकांना आपल्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. अविवाहित व्यक्तींचे प्रेमसंबंध एक पाऊल पुढे जाऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने काळ चांगला राहील.