बुध आणि सूर्य :
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव पडतो. काही योग ग्रहांच्या हालचालींमुळे तयार होतात. सप्टेंबर महिन्यात बुधादित्य राजयोगाचा शुभ प्रभाव राहील.
१६ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. त्याचप्रमाणे २३ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करेल. या संयोगामुळे कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होईल. यामुळे काही राशींना नशीबाची खास साथ लाभेल.
वृश्चिक :
बुधादित्य राजयोगाच्या या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. आगामी काळात वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याच्या आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. वृश्चिक राशीचे जातक या काळात आनंदी राहतील.
सिंह :
सिंह राशीच्या जातकांना बुधादित्य राजयोगाच्या या काळात नफा प्राप्त होईल. आगामी काळात सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये खूप आत्मविश्वास राहील. उच्च पदावरील व्यक्तींशी संपर्क राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल आणि थकीत पैसे मिळतील.
(Pixabay)मकर :
या राजयोगामुळे मकर राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. या कालावधीत कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची संधी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. मकर राशीच्या जातकांना या काळात मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)