(1 / 7)पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात प्रदोष व्रत असतो. बुधवार ७ फेब्रुवारी रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत आहे. वारानुसार वेगवेगळ्या नावांनी प्रदोष व्रत ओळखले जाते आणि दिवसानुसार या व्रताचे वेगळे महत्त्व आहे. प्रदोष व्रत बुधवारी केले तर त्याला बुध प्रदोष म्हणतात. या दिवशी महादेवाची म्हणजेच शिवाची विशेष पूजा केली जाते.