बुध या ग्रहाला नव ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. तो वाणी, बुद्धी, ज्ञान, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि प्रगतीचा अधिपती आहे. भगवान बुध प्रत्येक वेळी राशी बदलतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडत असतो. बुध हा असा ग्रह आहे, जो फार कमी वेळात आपले स्थान बदलू शकतो. भगवान बुध सध्या मेष राशीत भ्रमण करत आहेत.
१० मे रोजी बुधाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर, या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३१ मे रोजी बुध वृषभ राशीत जाईल. बृशाभ ही भगवान शुक्राच्या मालकीची रास आहे. वृषभ राशीत जाणारा भगवान बुध सर्व राशींवर नक्कीच परिणाम करेल. मात्र, काही राशींना नशिबाची साथ लाभणार आहे. या काळात कोणत्या राशींना फायदा होणार, जाणून घेऊया…
वृषभ : बुध तुमच्या राशीतील पहिल्या भावात प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक वाढ होईल. घेतलेले सर्व निर्णय तुमचे भाग्य बदलून टाकतील. नोकरीच्या ठिकाणी बढती आणि पगारवाढ मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. अविवाहित लोकांचे लवकरच लग्न होईल.
मिथुन: बुध ग्रह तुमच्या राशीत १२व्या भावात भ्रमण करत आहे. यामुळे पैशांची बचत होण्याची शक्यता वाढेल. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. सर्व कामात यश मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नोकऱ्या उपलब्ध होतील. हाती घेतलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल.