वाक्चातुर्य, बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि शिक्षणात बुध महत्त्वाची भूमिका बजावतो. बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध अतिशय कमी वेळात आपले स्थान बदलू शकतो.
बुधाच्या गोचराचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्र सांगते की, जर बुध एका राशीत शिखरावर असेल तर ते बुद्धिमत्तेत श्रेष्ठ ठरतील. ३१ मे रोजी त्याने मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे.
वृषभ ही शुक्र ग्रहाची रास आहे. बुध आणि शुक्र हे मित्र ग्रह आहेत. या बुध गोचरामुळे काही राशींसाठी जीवनात चमत्कार घडू शकतात. पाहूया कोणत्या राशीसाठी हे गोचर लाभदायी ठरणार आहे…
मेष : बुध तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात भ्रमण करत आहे. यामुळे अनपेक्षित वेळी तुम्हाला पैसे मिळतील, उत्पन्नाचे नवे स्त्रोत वाढतील, तुम्हाला नवीन संधी मिळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल, सुविधा आणि संधी वाढतील.
कुंभ : बुध आपल्या राशीच्या चौथ्या भावात भ्रमण करीत आहे, ज्यामुळे जीवनात आनंद वाढेल, व्यवसायाशी संबंधित बाबीत आपली प्रगती होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि व्यवसायात चांगला फायदा होईल.