Budh Gochar 2024 In Marathi : बुध एकाच महिन्यात दोनवेळा राशी बदलतो. त्याच्या गोचराचा परिणाम सर्व राशींवर होतो. मात्र काही राशींना यामाध्यमातून राजयोगाचा लाभ प्राप्त होणार आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
(1 / 6)
बुध हा नऊ ग्रहांचा राजकुमार आहे. अतिशय कमी वेळात तो आपले स्थान बदलतो. बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर नक्कीच होतो. वाणी, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धीसाठी बुध कारक आहे.
(2 / 6)
बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे.बुध सध्या कन्या राशीत जात आहे.
(3 / 6)
बुध एकाच महिन्यात दोनदा भ्रमण करतो आणि काही राशींना याद्वारे राजयोग प्राप्त होणार आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
(4 / 6)
तूळ : बुधाचे गोचर तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्य देईल. तुम्ही सर्व प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. व्यवसायातील सर्व समस्या कमी होतील, व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि व्यवसायात चांगली प्रगती कराल.
(5 / 6)
वृश्चिकवृश्चिक राशीसाठी बुधाचे गोचर चांगली प्रगती देणारे ठरेल. पैशांची बचत होण्याची शक्यता आहे. बक्कळ पैसे कमावण्याची शक्यता जास्त आहे. जीवनात अप्रतिम प्रगती कराल. आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल.
(6 / 6)
मकर : बुधाचे गोचर आपल्याला चांगली प्रगती देईल. नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळेल. अनपेक्षित वेळी व्यवसायात चांगली प्रगती होईल. दीर्घकालीन इच्छा पूर्ण होतील. दीर्घकालीन मेहनतीचे चांगले फळ मिळेल.