मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  National Brothers Day 2024 : पठाण ब्रदर्स ते सरफराज आणि मुशीर… भावंडांच्या या जोड्या भारतीय क्रिकेट गाजवतायत, पाहा

National Brothers Day 2024 : पठाण ब्रदर्स ते सरफराज आणि मुशीर… भावंडांच्या या जोड्या भारतीय क्रिकेट गाजवतायत, पाहा

May 24, 2024 04:33 PM IST
  • twitter
  • twitter
  • Brother In Indian Cricket Team : आपल्या भावाशी असलेल्या विशेष नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी नॅशनल ब्रदर्स डे (National Brothers Day) साजरा केला जातो. अशा स्थितीत ब्रदर्स डेच्या खास निमित्ताने आपण भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय भावंडांबद्दल जाणून घेणार आहोत.
आपल्या भावाशी असलेल्या विशेष नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी नॅशनल ब्रदर्स डे साजरा केला जातो. भाऊ खऱ्या अर्थाने वरदान आहेत. पार्टनर इन क्राइम म्हणून तो नेहमी सोबत असतो. तो आपला सर्वात मोठा समर्थक असतो आणि इतर कोणालाही शक्य नाही अशा प्रकारे आपल्याला समजून घेतो. ब्रदर्स डेच्या खास निमित्ताने आपण भारतीय क्रिकेटमधील भावंडांबद्दल जाणून घेणार आहोत.
share
(1 / 6)

राहुल चहर-दीपक चहर- राहुल आणि दीपक या दोघांनीही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण सध्या दोघेही टीम इंडियातून बाहेर आहेत. दीपक आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. तर राहुल पंजाब किंग्सचा भाग आहे.
share
(2 / 6)

संजू सॅमसन-सॅली सॅमसन- संजू सॅमसनच्या भावाचे नाव सॅली सॅमसन असून तो संजूपेक्षा मोठा आहे. तो अगदी संजूसारखा दिसतो. त्याचे आणि संजूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सॅली सॅमसनने आतापर्यंत फक्त लिस्ट ए क्रिकेट खेळले आहे.
share
(3 / 6)

इरफान पठाण-युसूफ पठाण- इरफान आणि युसूफ या दोघांनीही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोघेही सध्या निवृत्त झाले असून कॉमेंट्री करताना दिसतात. इरफान-युसूफ दोघेही २००७च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य आहेत. दोघांनीही टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
share
(4 / 6)

हार्दिक पंड्या-कृणाल पंड्या- हार्दिक आणि कृणाला या दोघांनीही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. हार्दिक टीम इंडियाचा नियमित सदस्य आहे. तर कृणाल सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. हार्दिक आयपीएलमध्ये  मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. तर कृणाल लखनौ सुपर जायंट्सचा सदस्य आहे.
share
(5 / 6)

सरफराज खान-मुशीर खान- सरफराजला नुकतीच टीम इंडियाची कॅप मिळाली आहे. तर मुशीर अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मुंबईच्या रणजी संघात आला आहे. दोघांनाही वडील नौशाद खान यांच्याकडून क्रिकेटचे धडे मिळाले आहेत. दोघेही भविष्यातील स्टार मानले जात आहेत.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज