
कतारमध्ये कपड्यांबाबतचे नियम अतिशय कडक आहेत, मात्र असे असतानाही परदेशातून विश्वचषक पाहण्यासाठी आलेले फुटबॉल चाहते नियमांच्या विरोधात वागताना दिसून येत आहेत. यामध्ये एका ब्राझिलियन महिला कॉमेंटेटरच्या कपड्यांमुळे खळबळ उडाली आहे.
कतार हा इस्लामिक देश आहे आणि येथील नियम आणि कायदेही इस्लामिक आहेत. हे कठोर नियम पाळणे परदेशी प्रक्षकांना खूप कठीण जात आहे.
कतारमध्ये फिफा विश्वचषक पाहण्यासाठी परदेशातून आलेल्या चाहत्यांना काही नियम घालून दिले आहेत. ते पाळणे त्यांना बंधनकारक आहेत. यात कपड्यांबाबतचे नियम अतिशय कडक आहेत. या अंतर्गत, कोणतीही महिला आणि पुरुष असे कपडे घालणार नाहीत ज्यामध्ये त्यांचा खांदा दिसत असेल. तसेच सर्वांचे कपडे हे किमान गुडघ्यापर्यंत असावेत.
विशेष म्हणजे, महिलांनी घट्ट कपडे परिधान करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पण ब्राझीलमधील महिला समालोचक डेबोरा सेकोने आणि आउट फिटने सर्व सीमा पार करत कतारच्या नियमांचा भंग केला आहे.
स्पोर्ट्स कॉमेंट्री व्यतिरिक्त मॉडेलिंग करणाऱ्या ४२ वर्षीय डेबोराला फिफा विश्वचषकात रूल ब्रेकर म्हटले जात आहे. कतारच्या नियमांच्या विरोधात डेबोरा नेहमी क्रॉप टॉप, किलर हील्स आणि ड्रॉप-वेस्ट ट्राउझर्समध्ये दिसली आहे. तिचे ड्रेस खूपच बोल्ड असतात.
ब्राझीलच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारमधील अधिकाऱ्यांनी डेबोराहच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे आणि तिला आठवण करून दिली की येथे येणाऱ्या पाहुण्यांनी सभ्य कपडे घालावेत. डेबोराह सेकोचे इंस्टाग्रामवर २४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने नुकतेच तिच्या पेजवर अनेक हॉट फोटो पोस्ट केले आहेत. यानंतर ती खूप चर्चेत आहे.
कतारमध्ये जारी केलेल्या ड्रेस कोडनुसार, कोणीही (महिला अथवा पुरुष) शरीराभोवती अतिशय घट्ट असलेले कपडे घालू शकत नाही. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही फाटलेली पँट किंवा जीन्स घालण्यास तसेच स्लीव्हलेस शर्ट किंवा कपडे घालण्यास मनाई आहे.





