ब्राजीलमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विमानातून घेतलेल्या या छायाचित्रात पुराची भीषणता दिसून येते. ब्राझीलमधील रिओ ग्रांदे डो सुल, पोर्टो अलेग्रे मधील नेवेगँट्स परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. दक्षिण ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे किमान ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास ७०,००० लोक विस्थापित झाले आहेत.
(AFP)पोर्टो अलेग्रे, रिओ ग्रांडे डो सुल या ब्राझीलचा पूरग्रस्त झोन घोषित करण्यात आला असून येथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षादले आणि आपत्ति व्यवस्थापन विभाग प्रयत्न करत आहेत. या पुरामुळे ७४ नागरिक जखमी झाले आहेत. तर ६७ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
(AFP)पोर्टो अलेग्रे, रिओ ग्रॅन्डे डो सुल, ब्राझील येथे पावसामुळे आलेल्या पुरामुळे जलमग्न झालेल्या भागातून बचाव अधिकाऱ्यांनी एका तरुण मुलीची सुटका केली. रिओ ग्रांदे डो सुल राज्यातील जलद गतीने वाढणाऱ्या पाण्याची पातळी धरणांवरील ताण वाढवत आहे. यामुळे १.४ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या पोर्टो अलेग्रे शहराला धोका निर्माण झाला आहे.
(AP)पोर्टो अलेग्रे, रिओ ग्रांदे डो सुल येथे निर्वासीतांसाठी कॅम्प लावण्यात आले आहे. येथील गुएबा नदीने धोक्याची ५.४ मीटर (१६.५ फूट) ची पातळी ओलांडली आहे. १९४१ मध्ये येथे विनाशकारी पुर आला होता. त्यावेळी ४.७६ मीटर पर्यन्त पाणी पातळी पोहोचली होती.
(AFP)ब्राझीलमधील रिओ ग्रँडे डो सुल, पोर्तो अलेग्रेच्या साओ गेराल्डो परिसरात पूरग्रस्त घराच्या प्रवेशद्वारावर उभा असलेला एक नागरिक.. पुरामुळे पोर्टो अलेग्रे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
(AFP)पोर्टो अलेग्रेमध्ये, रिओ ग्रँडे डो सुल, ऑफ-रोड ड्रायव्हर्सचे एक पथक पुराच्या दरम्यान बचाव कार्य राबावत असतांना. मोठ्या प्रमाणात पुर आल्याने येथील घरे रिकामे करण्याचे आणि सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करनेत आले आहे. या साठी बचाव पथके, जेट स्कीचा वापर करून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
(AFP)पोर्टो अलेग्रेमध्ये, रिओ ग्रँडे डो सुल, ऑफ-रोड ड्रायव्हर्सचे एक पथक पुराच्या दरम्यान बचाव कार्य राबावत असतांना. मोठ्या प्रमाणात पुर आल्याने येथील घरे रिकामे करण्याचे आणि सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करनेत आले आहे. या साठी बचाव पथके, जेट स्कीचा वापर करून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे. शनिवारी स्किड स्टीयर लोडरचा वापर करून रिओ ग्रांडे डो सुल, पोर्तो अलेग्रेच्या साओ गेराल्डो परिसरातील पूरग्रस्त भागातून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.
(AFP)