सिनेप्रेमींसाठी एप्रिल महिना खूप खास असणार आहे. २०२५मधील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये कोणकोणत्या चित्रपटांची टक्कर होणार आहे, ते जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जट्ट'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'जट्ट' हा चित्रपट १० एप्रिलला हिंदी, तेलुगू आणि तमिळमध्ये जगभरात रिलीज होणार आहे.
या चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असणार आहे. या प्रोजेक्टचे दिग्दर्शन तेलुगू अभिनेता गोपालचंद करत आहेत. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' देखील १० एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
यशचा मोस्ट अवेटेड 'टॉक्सिक' हा चित्रपट १० एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात नयनतारा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अजित कुमारचा आगामी चित्रपट 'गुड बॅड अग्ली' हा देखील १० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अधिक रविचंद्रन यांनी केले आहे.