दुधी भोपळा खायला खूप चविष्ट आहे. काहींना दुधीचा रस प्यायला आवडतो. तर काहींना त्याची भाजी खायला आवडते. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक त्यामध्ये आढळतात. परंतु दुधी भोपळा काही लोकांना खायला चालत नाही. या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांनी दुधी खाऊ नये…
(freepik)खराब पचनक्रिया-
जर तुमची पचनशक्ती खराब असेल तर दुधी खाणे टाळा. कारण त्यात जास्त प्रमाणात फायबर असते. जे काही लोकांना पचवता येत नाही. अशा परिस्थितीत दुधी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, जुलाब, पोटदुखी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ज्यांची पचनशक्ती खराब आहे, त्यांनी दुधीला पूर्णपणे टाळावे.
ॲलर्जीमध्ये-
दुधी भोपळ्याचा गर प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारची फूड ॲलर्जी असल्यास दुधीचे सेवन करू नका. जर तुम्हाला दुधी खायला खूप आवडत असेल तर तुमच्या आहारतज्ञांच्या सल्ल्यानेच ती खा. कारण त्यामध्ये नैसर्गिक संयुगे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी किंवा खाज येऊ शकते.
किडनीच्या आजाराने ग्रस्त लोक-
ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी दुधीचे सेवन करू नये. कारण दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे किडनीच्या समस्या वाढू शकतात. दुधी खाल्ल्याने किडनीला गाळण्यास त्रास होतो. त्यामुळे किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी दुधी कधीही खाऊ नये.
बद्धकोष्ठता-
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी दुधीचे सेवन करू नये. कारण दुधीमध्ये फायबर आणि पाणी दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक तत्वांचे संतुलन बिघडू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर दुधी खाऊ नका. दुधी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होतो.