नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी रुपये होते. परंतु, चित्रपटाने फार कमी वेळात त्याचे मेकिंग बजेट वसूल केले. पण, प्रत्येक बिग बजेट चित्रपटाबाबत असे होतेच असे नाही. चला अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे बजेट प्रचंड असूनही बॉक्स ऑफिसवर त्यांना पसंती मिळाली नाही.
लव्ह स्टोरी २०५०: २००८मध्ये आलेला 'लव्ह स्टोरी २०५०' हा चित्रपट या यादीत सामील आहे. हरमन बावेजा आणि प्रियांका चोप्रा अभिनीत या चित्रपटाचे बजेट ६० कोटी रुपये होते. पण, त्याची एकूण कमाई फक्त १८ कोटी रुपये होती.
ट्यूबलाईट: बड्या स्टार्सबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खानही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. २०१७मध्ये रिलीज झालेल्या १३५ कोटी रुपयांच्या 'ट्यूबलाईट' या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ १२१ कोटी रुपये होते.
झीरो: शाहरुख खानच्या 'झीरो' या चित्रपटात किंग खानला ठेंगणा दाखण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आणि चित्रपटाचे मेकिंग बजेट तब्बल २०० कोटी रुपये होती. पण, त्याची एकूण कमाई फक्त ९७ कोटी रुपये होती.
बॉम्बे वेल्वेट: २०१५मध्ये रिलीज झालेला रणबीर कपूरचा 'बॉम्बे वेल्वेट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. अंदाजे १२५ कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाची एकूण कमाई केवळ ३४ कोटी रुपये होती.
रा.वन: २०११मध्ये रिलीज झालेला 'रा.वन' हा शाहरुख खानचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण, १३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ ११४ कोटी रुपये होते.
कलंक: वरुण धवनच्या मल्टीस्टारर चित्रपट 'कलंक'चे बजेट १५० कोटी रुपये होते. पण, त्याची एकूण कमाई फक्त १४६ कोटी रुपये होती.