
असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या पत्नी टॅलेंटमध्ये त्यांच्यापेक्षा अजिबात कमी नाहीत. काही कलाकारांनी चित्रपटसृष्टीतील तर, काहींना इंडस्ट्रीबाहेरील तरुणींशी लग्न केले आहे.आज आम्ही तुम्हाला एका अशा स्टारच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत, जी बिझनेस जगावर राज्य करत आहे.
(instagram)ही बॉलिवूड वाईफ आहे, राम चरणची पत्नी उपासना कामीनेनी. राम आणि उपासना यांच्या नात्याची खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेहमीच एकत्र असतात.
(instagram)उपासनाच्या व्यावसायिक जीवनाबद्दल सांगायचे तर, ती अपोलो चॅरिटीची उपाध्यक्ष आणि पी पॉझिटिव्ह मासिकाची मुख्य संपादक देखील आहे.
(instagram)तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचे तर, उपासनाची एकूण संपत्ती ११३० कोटी रुपये आणि राम चरणची १३७० कोटी रुपये आहे. दोघांची मिळून एकूण संपत्ती २५०० रुपये आहे.
(instagram)राम आणि उपासना कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र आहेत. दोघेही एकत्र शिकत होते, पण त्यावेळी एकमेकांबद्दल त्यांच्या मनात काहीच भावना नव्हती. 'मगधीरा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रामला उपासनाबद्दल प्रेम वाटले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
(instagram)राम आणि उपासना यांचे २०१२मध्ये लग्न झाले, जे खूप भव्यदिव्य होते. यामध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. गेल्या वर्षी लग्नाच्या १० वर्षानंतर दोघेही एका मुलीचे पालक झाले.
(instagram)



