Bollywood Upcoming Movie: २०२४मध्ये उरलेत अवघे काही महिने; तरी मनोरंजनाची मेजवानी मिळणार! कोणते सिनेमे रिलीज होणार?-bollywood upcoming hindi films and sequels much awaited singham again pushpa 2 dhadak 2 theatre movie release date 2024 ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Upcoming Movie: २०२४मध्ये उरलेत अवघे काही महिने; तरी मनोरंजनाची मेजवानी मिळणार! कोणते सिनेमे रिलीज होणार?

Bollywood Upcoming Movie: २०२४मध्ये उरलेत अवघे काही महिने; तरी मनोरंजनाची मेजवानी मिळणार! कोणते सिनेमे रिलीज होणार?

Aug 30, 2024 11:18 AM IST
  • twitter
  • twitter
Bollywood Upcoming Movie 2024: २०२४चे उरलेले दिवस हिंदी सिनेप्रेमींसाठी आनंदाचे असणार आहेत. काही बहुप्रतिक्षित सिक्वेल आणि चित्रपट आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. पाहा कोणते चित्रपट कधी रिलीज होतायत...
२०२४ हे वर्ष सिक्वेलचे वर्ष आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ‘स्त्री २’च्या जबरदस्त क्रेझनंतर, काही धमाकेदार चित्रपट आणि काही बहुप्रतिक्षित सिक्वेल येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची नावे आणि रिलीज तारखा जाणून घेऊया…
share
(1 / 8)

इमर्जन्सी : येत्या काही काळात रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. काही लोक चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेत आहेत, तर कंगनाचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
share
(2 / 8)

मेट्रो इन दिनो : सारा अली खान, अनुपम खेर, अली फजल, पंकज त्रिपाठी स्टारर 'मेट्रो इन दिनो' सप्टेंबरमध्येच रिलीज होत आहे. चित्रपटाचा प्रकार ड्रामा रोमान्स आहे आणि रिलीजची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट ‘लाईफ इन अ मेट्रो’चा सिक्वेल आहे.
share
(3 / 8)

जिगरा: आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा ‘जिगरा’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. हा एक ॲक्शन चित्रपट आहे. याच दिवशी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘विकी और  विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपटही ११ ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
share
(4 / 8)

सिंघम अगेन: रोहित शेट्टीचा ॲक्शन, ड्रामा चित्रपट ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या आसपास थिएटरमध्ये येणार आहे. दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंह, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शीर्षकावरूनच लक्षात येते की, हा चित्रपट एक सिक्वेल आहे.
share
(5 / 8)

धडक २: 'धडक'चा सीक्वल 'धडक २' हा चित्रपट २२ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. तृप्ती डिमरी, सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे.
share
(6 / 8)

छावा आणि पुष्पा २: विक्की कौशलचा ॲक्शन, ड्रामा, ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ ६ डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. ‘पुष्पा २’च्या रिलीजची तारखी न बदलल्यास त्याची ‘छावा’सोबत टक्कर होऊ शकते. निर्मात्यांनी ६ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
share
(7 / 8)

वेलकम टू जंगल: अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वेलकम टू जंगल’ हा कॉमेडी चित्रपट २० डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
share
(8 / 8)

इतर गॅलरीज