इब्राहिम अली खान हुबेहुब त्याचे वडील सैफ अली खानसारखा दिसतो. त्याच्या चेहऱ्याचे फिचर्स, स्मितहास्य आणि अगदी हेअरस्टाइलही सैफसारखीच आहे. इब्राहिमची तुलना लहानपणीच्या सैफशी केली जाते.
निर्वाण खान त्याचे वडील सोहेल खान याची हुबेहूब कॉपी आहे. त्याचा चेहरा आणि उंची अगदी वडिलांसारखीच आहे. त्याचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावही सगळ्यांना सोहेलची आठवण करून देतात.
गोविंदा लहानपणी यशवर्धनसारखा दिसत होता. बाप-लेक दोघांमध्ये अनेक समानता आहेत. याशिवाय यशही वडिलांप्रमाणेच चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. नृत्यातही तो वडिलांना तगडी स्पर्धा देतो.
मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खानकहा चेहरा त्याचे वडील अरबाज खान याच्या तारुण्यातील दिवसांची आठवण करून देणारा आहे. त्याची शारीरिक रचना, चेहऱ्याची रचना आणि हास्य अरबाजशी अगदी जुळते. दोघे एकमेकांचे कार्बन कॉपी आहेत.
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिची हुबेहुब कॉपी दिसते. तिचे डोळे, हसू आणि चेहऱ्यावरचा निरागसपणा रवीनाची झलक देतो. आईप्रमाणेच राशाही चित्रपटांमध्ये दिसली आहे.
खुशी कपूर तिची आई श्रीदेवीसारखी दिसते. तिचे मोठे डोळे, नाक आणि सुंदर व्यक्तिमत्व श्रीदेवीची आठवण करून देते. अभिनेत्रीने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये तिच्या आईचा सिल्व्हर गाऊन परिधान केला होता.