Bollywood Siblings: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अगदी त्यांच्या भावंडांची कार्बन कॉपी वाटतात. भूमी-समीक्षापासून ते शिल्पा-शमितापर्यंत असे अनेक स्टार्स भावंडं आहेत, जी दिसायला अगदी जुळी वाटावीत इतकी एकसारखी दिसतात.
(1 / 8)
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे अगदी त्यांच्या भावंडांची कार्बन कॉपी वाटतात. भूमी-समीक्षापासून ते शिल्पा-शमितापर्यंत असे अनेक स्टार्स भावंडं आहेत, जी दिसायला अगदी जुळी वाटावीत इतकी एकसारखी दिसतात.
(2 / 8)
भूमी आणि समिक्षा पेडणेकर- चित्रपट विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भूमी पेडणेकरचा चेहरा हुबेहुब तिची धाकटी बहीण समिक्षा सारखाच आहे. दोघी इतक्या सेम टू सेम दिसतात की, फरक ओळखण्यात अनेकांची गल्लत होते.
(3 / 8)
अनुपम खेर आणि राजू खेर- अनुपम खेर यांचा धाकटा भाऊ राजू खेर अगदी हुबेहुब अनुपम खेर यांच्यासारखाच दिसतो. राजू खेर यांनी देखील अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे.
(4 / 8)
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी- शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या दोघींचे चेहरेही अगदी सारखे दिसतात. मात्र, शमिता शेट्टी तिची मोठी बहीण शिल्पाप्रमाणे बॉलिवूडमध्ये काही खास जादू करू शकली नाही.
(5 / 8)
आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना- आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना यांचाही या यादीत समावेश आहे.
(6 / 8)
अनिल कपूर आणि संजय कपूर - अनिल कपूर आणि त्याचा धाकटा भाऊ संजय कपूरसुद्धा जवळपास सारखेच दिसतात. त्यांच्या हसण्यापासून ते त्यांच्या हावभावापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी सारख्या आहेत.
(7 / 8)
मौनी रॉय आणि मुखेर रॉय - टीव्हीच्या दुनियेतून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मौनी आज बॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध नाव बनली आहे. मौनीचा चेहरा तिचा भाऊ मुखरसारखा आहे.
(8 / 8)
रोनित आणि रोहित - रोनित आणि रोहित हे दोन्ही भाऊ चित्रपटांमध्ये आणि मालिकाविश्वामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचे चेहरे अगदी सारखे आहेत. (All Photos: Instagram)