मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Divorce: ईशा-भरतआधी बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांनी देखील घेतलाय १० वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट!

Bollywood Divorce: ईशा-भरतआधी बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांनी देखील घेतलाय १० वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट!

Feb 07, 2024 06:42 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Bollywood Popular Divorce: ईशा आणि भरत यांनी लग्नाच्या १२ वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली आहे. या जोडीपूर्वी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल्सनी आपला भरला संसार मोडत घटस्फोट घेतला आहे.

अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या दोघांना दोन मुली देखील आहेत. ईशा आणि भरत यांनी लग्नाच्या १२ वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली आहे. या जोडीपूर्वी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल्सनी आपला भरला संसार मोडत घटस्फोट घेतला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या घटस्फोटानेही सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या जोडप्याने १९९१मध्ये लग्न केले होते. तर, २००४मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान यांनी देखील लग्नाच्या तब्बल १४ वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. हृतिक आता सबा आझादला डेट करत आहे, तर सुझैन खान देखील अर्सलान गोनीसोबत रोमान्स करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनीही त्यांच्या अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. या जोडप्याने १९९८मध्ये लग्न केले होते आणि त्यांना अरहान नावाचा एक मुलगा आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

फरहान अख्तर आणि अधुना यांनी अनेक वर्षे सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद लुटला. मात्र, लग्नाच्या १७ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुली आहेत. फरहान अख्तरने आता शिबानी दांडेकरसोबत दुसरे लग्न केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

फरहान अख्तर आणि अधुना यांनी अनेक वर्षे सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद लुटला. मात्र, लग्नाच्या १७ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुली आहेत. फरहान अख्तरने आता शिबानी दांडेकरसोबत दुसरे लग्न केले आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज