Swara Bhasker Pregnancy: फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणाऱ्या स्वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नंट असल्याची माहिती दिली आहे.
(1 / 9)
१६ फेब्रुवारी रोजी स्वरा भास्करने सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वरा हिंदू आहे तर फहाद मुस्लिम समाजातील आहे.(PC: Swara Bhasker Instagram)
(2 / 9)
मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे स्वरा ट्रोल झाली होती. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही दिल्ली लव्ह जिहाद घटनेची तुलना स्वराशी केली होती.
(3 / 9)
‘स्वराने लग्नाआधी विचार करायला हवा होता. तिची परिस्थिती श्रद्धा वायकरसारखी होऊ नये’ असे साध्वी प्राची यांनी म्हटले होते.
(4 / 9)
त्यानंतर लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सजवलेल्या खोलीचा फोटो शेअर करून स्वरा भास्कर पुन्हा चर्चेत आली होती.
(5 / 9)
आता या जोडप्याने प्रेग्नन्सी जाहीर केल्याने पुन्हा ट्रोल होत आहे. लोक या दोघांची तुलना आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत करत आहेत
(6 / 9)
आलिया आणि रणबीरने लग्नाच्या २ महिन्यांनंतर प्रेग्नन्सी जाहीर केली होती. त्यानंतर आता स्वराने देखील बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. ते पाहून अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. काहींनी तिची तुलना आलिया-रणबीरशी केली आहे.
(7 / 9)
स्वरा ५-६ महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे फोटोवरुन म्हटले जात आहे. 'प्रेग्नंट असल्यामुळे तुम्ही घाईघाईत लग्न केलेत' असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे.
(8 / 9)
स्वरा भास्करने तिचा पती फहाद अहमदसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, 'कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकाच वेळी ऐकली जाते. आता पूर्णपणे नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले.
(9 / 9)
आता स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिने अद्याप ट्रोलर्सला उत्तर दिलेले नाही.