बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिने देवदर्शन केले आहे
(1 / 6)
काल, २३ मार्च रोजी पंगा क्वीनचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिने हिमाचलमधील काही मंदिरांना भेट दिली आहे. तिच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(Instagram)
(2 / 6)
कंगनाने हिमाचलमधील बगलामुखी आणि ज्वाला देवी मंदिराला भेट दिली. मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले होते.(Instagram)
(3 / 6)
हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध बागलामुखी मंदिराला भेट दिल्यानंतर मी माझ्या कुटुंबासह ज्वाला देवी शक्तीपीठातही गेले होते, असे कंगनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत केले आहे.(Instagram)
(4 / 6)
पुढे ती पोस्टमध्ये म्हणाली की, “सर्वजण सुखी आणि निरोगी राहोत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”(Instagram)
(5 / 6)
कंगना राणौत लहानपणी ज्वाला देवी मंदिरात गेली होती. त्यानंतर तिने कधी मंदिरात पाऊल टाकले नव्हते. आता वाढदिवसानिमित्त ती मंदिरात गेली.(Instagram)
(6 / 6)
दरम्यान, कंगनाने हिरव्या आणि लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कपाळाला कंगनाने पिवळ्या रंगाचा भंडारा लावला आहे.(Instagram)