अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. तिच्या लूकवर नेहमीच चाहते फिदा असतात. पण सध्या तिच्या एका ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या लूकवर चाहते कायम फिदा असतात. जान्हवी कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये दिसते. नुकताच जान्हवीच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Instagram/@janhvikapoor)
(2 / 5)
जान्हवीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा डिपनेक फ्रॉक परिधान केला आहे. (Instagram/@janhvikapoor)
(3 / 5)
मोकळे सोडलेले केस, गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा डायमंड नेकलेस, हातात अंगठी असा जान्हवी कपूरचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(Instagram/@janhvikapoor)
(4 / 5)
जान्हवीचा हा ड्रेस तुम्हाला आवडला असेल. त्याची किंमत ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित होऊ शकता. डिझायनर ब्रँड अलेसेन्ड्रा रिचच्या या ड्रेसची किंमत २२३२ डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.८६ लाख रुपये.(Instagram/@janhvikapoor)
(5 / 5)
जान्हवीने या ड्रेसवर फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवाणीने डिझाइन केलेले मोत्याचे कानातले घातले आहेत. (Instagram/@janhvikapoor)
(6 / 5)
जान्हवीने मेकअप आर्टिस्ट तन्वी चेंबूरकर कडून मेकअप करुन घेतला आहे. (Instagram/@janhvikapoor)