अनन्या पांडे नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिच्या आगामी प्रोजेक्ट ‘कॉल मी बे’ची घोषणा करण्यात आली. यावेळी तिच्या बार्बी पिंक ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
(Instagram)अनन्या पांडेने ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ कार्यक्रमातील तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लाँग पँटसह क्रॉप टॉप, ट्यूल ट्रेन या राहुल मिश्राच्या बार्बी पिंक लूक ड्रेसमध्ये अनन्या खूप सुंदर दिसत होती. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अमी पटेलने हा लूक क्रिएट केला आहे.
(Instagram)अनन्या पांडेने "हे बे" असे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहेत. या ड्रेसने अनन्याला खास लुक दिला आहे.
(Instagram)या लूकसोबत तिने स्टेटमेंट रिंग्स आणि हार्ट शेप्ड इअर स्टड घातले होते. ड्रेस आणि ॲक्सेसरीजनुसार तिने आपल्या लूकला साजेसा मेकअप केला होता.
(Instagram)