बॉलीवूडमध्ये, बहुतेक कलाकार हे आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. सिनेविश्वात प्रत्येक कलाकार हा फिटनेसवर जास्त काम करतो. पण तुम्हाला माहित आहे का इंडस्ट्रीतील कोणत्या ७ अभिनेत्यांची बॉडी उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा अभिनेत्यांबद्दल ज्यांची शरीरयष्टी सर्वात अप्रतिम आहे आणि चाहते त्यांना शर्टलेस पाहण्यास उत्सुक असतात.
या यादीची सुरुवात अभिनेता हृतिक रोशनपासून होते, ज्याला बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटले जाते. हृतिकने आपली बॉडी गेली कित्येक वर्षे सांभाळली आहे. त्याला शर्टलेस पाहण्यासाठी चाहते सर्वात जास्त उत्सुक असतात.
बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर मशीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंगची बॉडी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मस्क्युलर अभिनेत्यांबद्दल बोलताना सलमान खानचे नाव सर्वात पहिले घेतले जाते.
टायगर श्रॉफकडे बॉलीवूडमध्ये फारसे हिट चित्रपट नाहीत, पण त्याचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. टायगर त्याच्या चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट करतो आणि त्याची शरीरयष्टी उत्तम आहे.
वरुण धवन सहसा हलक्या भूमिका करतो आणि त्यामुळे चित्रपटात त्याची बॉडी दाखवली जात नाही. पण वरुणची बॉडी उत्तम आहे.