बॉलीवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांचा विचार केला तर बऱ्याच वेळा स्क्रिप्ट अशी असते की नायकासह नायिकेलाही खतरनाक स्टंट करावे लागतात. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून स्टंट केले आहेत. पण तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही फिट अभिनेत्रींबद्दल माहिती आहे का, ज्या ॲक्शन चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती आहेत. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी…
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. पण तिचे अॅक्शन सीन्स नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
दीपिका पदुकोणने आतापर्यंत अनेक अप्रतिम ॲक्शन चित्रपट केले आहेत. तिने शूट केलेला प्रत्येक अॅक्शन सीन हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आहे. त्यामुळे ती नेहमी अॅक्शन सीनसाठी निर्मात्यांची पसंती असते.
प्रियांका चोप्राने डॉन-2, जय गंगाजल आणि क्वांटिको यांसारख्या प्रोजेक्टमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेली नाही.
कतरिना कैफने सलमान खानच्या टायगर सिरीज, धूम-3 आणि बँग बँग सारख्या चित्रपटांमध्ये अप्रतिम स्टंट केले आहेत. अभिनेत्रीची अप्रतिम शरीरयष्टी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
तापसी पन्नू देखील बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने काही चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन्स दिले आहेत.