काळानुसार चित्रपटांमध्ये व्हीएफएक्सचा वापर खूप वाढला आहे. यामुळे चित्रपटात अकल्पनीय गोष्टी दाखवणे शक्य झाले असले, तरी आता निर्माते चित्रपटातील गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी बनवू शकतात. पण त्यामुळे चित्रपटांचे बजेटही खूप वाढले आहे. चला तर मग, जाणून घेऊया बॉलिवूडमध्ये बनलेल्या सर्वाधिक बजेटच्या चित्रपटांबद्दल…
या यादीत पहिले नाव आहे 'आदिपुरुष' या चित्रपटाचे आहे. हा चित्रपट अंदाजे ७०० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. प्रभास, क्रिती सेनन आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली होती, पण व्हीएफएक्स आणि संवादांच्या दर्जामुळे हा चित्रपट खराब झाला.
अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर चित्रपट ‘२.०’ हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाची कथा खूपच समर्पक होती. पण, हा चित्रपट जेमतेम बजेट इतके पैसे देखील जमवू शकला नाही. या चित्रपटाचे बजेट ५७० कोटी रुपये होते.
एस.एस. राजामौली त्यांचे चित्रपट शक्य तितके वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न करतात. २०२२मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचे बजेट ५५० कोटी रुपये होते. राम चरण आणि जूनियर एनटीआर अभिनीत हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र - पार्ट वन शिवा' हा २०२२मधील सर्वात मोठा चित्रपट होता. या चित्रपटाचे बजेट ४१० कोटी रुपये होते आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला होता.
प्रभास आणि राणा दग्गुबती स्टारर चित्रपट 'बाहुबली - द कन्क्लुजन' हा देखील एक बिग बजेट चित्रपट होता. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट २५० कोटी रुपये होते आणि त्याने अंदाजे १८०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.