बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी अनेक कलाकारंनी आपली नावं बदलली असल्याचं अनेकांना माहितच असेल. मात्र, या कलाकारांची खरी नावं तुम्हाला माहितीयेत का? नाही? मग वाचाच...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे खरे नाव साजिद अली खान पतौडी असे आहे. करीना कपूर-खानशी लग्न केल्यानंतर ही गोष्ट उघड झाली होती.
अमिताभ बच्चन यांचे खरे नाव ‘इन्कलाब श्रीवास्तव’ असे होते. मात्र, नंतर बदलून अमिताभ बच्चन असे करण्यात आले होते.
राजकुमार राव याचे खरे नाव राजकुमार यादव आहे. मनोरंजन विश्वात आल्यानंतर त्याने आपले आडनाव बदलले. यादव आणि राव हे हरियाणा राज्याच्या एकाच घराण्यातील नावे आहेत, ज्या घराण्यात त्याचा जन्म झाला.
कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी असे होते. मात्र, मनोरंजन विश्वात आल्यानंतर सलमान खानच्या सूचनेनुसार तिने तिचे नाव कियारा अडवाणी असे केले.
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया असे आहे. पहिल्याच चित्रपटात अक्षयकेन साकारलेल्या पात्राचे नाव ‘अक्षय’ होते, जे त्याने खऱ्या आयुष्यातही धारण केले.
लेडी सुपरस्टार नयनतारा हिचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. तिचे नाव डायना मरियम कुरियन असे होते. मात्र, तिने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर स्वतःचे नाव नयनतारा असे केले.