कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याने १८ किलो वजन कमी केले. यासाठी कार्तिक आर्यनने साखर खाणेही सोडून दिले होते. चला जाणून घेऊया अशा कालाकाराबद्दल ज्यांनी चित्रपटांसाठी आश्चर्यकारक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.
फरहान अख्तर: फरहान अख्तरने २०१३मध्ये आलेल्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटासाठी ॲथलीटसारखे शरीर तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी त्याने आधी वजन वाढवले होते. त्यानंतर या चित्रपटासाठी त्याने १५ किलो वजन कमी देखील केले.
भूमी पेडणेकर: अभिनेत्री भूमी पेडणेकरने २०१५मध्ये आलेल्या 'दम लगा के हईशा' या चित्रपटासाठी तिचे वजन वाढवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी तिने २७ किलो वजन वाढवले होते. चित्रपटात तिचे वजन ९२ किलो होते.
विद्या बालन: 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी विद्या बालनने १२ किलो वजन वाढवले होते. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताची कथा 'द डर्टी पिक्चर'मध्ये दाखवण्यात आली होती.
आमिर खान: आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यापूर्वी या चित्रपटासाठी आमिर खानने २५ किलो वजन वाढवले होते. नंतर चित्रपटातील काही भागांसाठी त्याने वजन कमी केले.
करीना कपूर: 'टशन' हा चित्रपट २००८साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी करीना कपूरने २० किलो वजन कमी केले होते. या चित्रपटानंतर 'झिरो फिगर' हा शब्द चर्चेत आला होता.