प्लास्टिक सर्जरी हा शब्द बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. या यादीत अनेक बड्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे, ज्यांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे आपले सौंदर्य आणखी वाढवले आहे. पण, एकीकडे प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून सौंदर्य वाढवले जात असताना, दुसरीकडे काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आजपर्यंत कधीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. या अभिनेत्री नैसर्गिकरित्या सुंदर आहेत.
रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझानेही प्लास्टिक सर्जरी करणे नेहमीच टाळले आहे. जिनिलियाने आजपर्यंत एकदाही प्लास्टिक सर्जरीही केलेली नाही. जिनिलियाने आतापर्यंत अनेक ब्लॉक बस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच, ती खूप चांगली पत्नी आणि दोन मुलांची आई देखील आहे. जिनिलिया पती रितेश आणि दोन मुलांसह वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.
आलिया भट्ट हिचे नाव बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत येते. आलियाने अनेक दमदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आलिया अशा बी-टाऊन अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी कधीच प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. आलिया तिच्या नैसर्गिक सौंदर्याने लोकांची मने जिंकते. पीपल मॅगझिनच्या वर्ल्ड मोस्ट ब्युटीफुल लिस्टमध्ये आलिया भट्टचे नाव देखील आहे.
अभिनेत्री यामी गौतमच्या सौंदर्याने मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. ती हिमाचलच्या बिलासपूरची रहिवासी आहे. यामी गौतमने टीव्ही आणि मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट काम केले आहे. परंतु, आजपर्यंत तिने तिच्या चेहऱ्याशी छेडछाड केलेली नाही. यामी गौतम देखील तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर खूप खुश आहे.