मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Rumors: लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्री गरोदर असल्याच्या उडाल्या होत्या अफवा! एकीचा झालाय नुकताच ब्रेकअप

Bollywood Rumors: लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्री गरोदर असल्याच्या उडाल्या होत्या अफवा! एकीचा झालाय नुकताच ब्रेकअप

Jul 02, 2024 06:22 PM IST
  • twitter
  • twitter
Bollywood Actresses Pregnancy Rumors: बॉलिवूड अभिनेत्रींचे आयुष्य अजिबात सोपे नसते. दररोज त्यांच्याबद्दल काही ना काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात. या सगळ्यात सर्वात मोठी अफवा म्हणजे त्यांच्या लग्ना आधीच त्या आई होणार असल्याच्या चर्चा... या चर्चा ऐकून अभिनेत्री स्वतः देखील अस्वस्थ होतात.
बॉलिवूड अभिनेत्रींचे आयुष्य अजिबात सोपे नसते. दररोज त्यांच्याबद्दल काही ना काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात. या सगळ्यात सर्वात मोठी अफवा म्हणजे त्यांच्या लग्ना आधीच त्या आई होणार असल्याच्या चर्चा... या चर्चा ऐकून अभिनेत्री स्वतः देखील अस्वस्थ होतात.
share
(1 / 6)

सध्या सगळीकडे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचीच चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची मेहंदी उतरली नाही, तोच तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या. सोनाक्षी लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ती नुकतीच तिच्या पतीसोबत हॉस्पिटलबाहेर दिसली होती, त्यानंतर या अफवांना आणखीनच हवा मिळाली. मात्र, सत्य हे आहे की सोनाक्षी गर्भवती नसून तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. म्हणूनच ती आणि झहीर इक्बाल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
share
(2 / 6)

सोशल मीडियावर प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी परिणीती चोप्राही वैतागली होती. जसजसे अभिनेत्रीचे वजन थोडे वाढले, तसतशा लोकांच्या नजरा तिच्या पोटाकडे वळल्या. यानंतर तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शेवटी अभिनेत्रीलाच चाहत्यांना सांगावे लागले की, ती प्रेग्नंट नाहीये. लोकांचा कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून तिने कपडे घालण्याची शैलीही बदलली.
share
(3 / 6)
सोशल मीडियावर प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी परिणीती चोप्राही वैतागली होती. जसजसे अभिनेत्रीचे वजन थोडे वाढले, तसतशा लोकांच्या नजरा तिच्या पोटाकडे वळल्या. यानंतर तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शेवटी अभिनेत्रीलाच चाहत्यांना सांगावे लागले की, ती प्रेग्नंट नाहीये. लोकांचा कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून तिने कपडे घालण्याची शैलीही बदलली.(PTI)
कतरिना कैफ आई होणार असल्याची चर्चा अनेकदा कानावर येते. अभिनेत्री पोल्का डॉट ड्रेस परिधान करते किंवा सैल सूट घालते, तेव्हा लोक म्हणू लागतात की, कतरिना गर्भवती आहे. मात्र, अद्याप ती गर्भवती नाही.
share
(4 / 6)
कतरिना कैफ आई होणार असल्याची चर्चा अनेकदा कानावर येते. अभिनेत्री पोल्का डॉट ड्रेस परिधान करते किंवा सैल सूट घालते, तेव्हा लोक म्हणू लागतात की, कतरिना गर्भवती आहे. मात्र, अद्याप ती गर्भवती नाही.
ऐश्वर्या राय तिच्या पर्सनल लाईफमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एक काळ असा होता की, ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांनी एवढा जोर धरला होता की, लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिच्या गर्भधारणेची अफवा पसरली होती. असे म्हटले गेले होते की, निर्माते तिच्यावर नाराज झाले होते, कारण तिच्यामुळे चित्रपट अर्धवट थांबला होता. मात्र, यानंतर त्या अफवा असल्याचे सिद्ध झाले.
share
(5 / 6)
ऐश्वर्या राय तिच्या पर्सनल लाईफमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एक काळ असा होता की, ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांनी एवढा जोर धरला होता की, लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिच्या गर्भधारणेची अफवा पसरली होती. असे म्हटले गेले होते की, निर्माते तिच्यावर नाराज झाले होते, कारण तिच्यामुळे चित्रपट अर्धवट थांबला होता. मात्र, यानंतर त्या अफवा असल्याचे सिद्ध झाले.(AFP)
अभिनेत्री मलायका अरोरा देखील वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या दरम्यान अभिनेत्री पतीपासून विभक्त होऊन, अभिनेत्याला डेट करत होती. मलायकाने ती अर्जुनला डेट करत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर, ही जोडी एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यानंतर ती गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता मलायका आणि अर्जुन कपूर यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज