मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepika Padukone Baby: जन्माला येण्याआधीच दीपिका पदुकोणचं बाळ बनलं अ‍ॅक्टर; ‘या’ चित्रपटात केलं काम!

Deepika Padukone Baby: जन्माला येण्याआधीच दीपिका पदुकोणचं बाळ बनलं अ‍ॅक्टर; ‘या’ चित्रपटात केलं काम!

Jul 05, 2024 03:23 PM IST
  • twitter
  • twitter
Deepika Padukone Baby: अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या गरोदर असून, सप्टेंबरमध्ये तिची प्रसूती होणार आहे. दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच आई-वडील होणार असून, यामुळे दोघेही खूप खूश आहेत
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या गरोदर असून, सप्टेंबरमध्ये तिची प्रसूती होणार आहे. दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच आई-वडील होणार असून, यामुळे दोघेही खूप खूश आहेत. दीपिका नुकतीच ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात झळकली आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
share
(1 / 6)

दीपिका पदुकोण हिने गरोदरपणात ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाचं शूटिंग केलं असून, या चित्रपटात तिची सहाय्यक भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, दीपिका गरोदर असताना तिने दोन दिवस चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. तर, शाश्वत चॅटर्जी यांनी सांगितले की, त्यावेळी रणवीर सिंह चित्रपटाच्या सेटवर हजर असायचा.
share
(2 / 6)

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नाग अश्विन म्हणाले की, जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता, तेव्हा दीपिका गरोदर होती. यावेळी नाग अश्विन हसला आणि म्हणाला की, दोन दिवस असे होते, दीपिका पदुकोणच्या जन्माला न आलेल्या बाळानेही या चित्रपटात काम केले होते. दीपिकाचा हा शॉट चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे, ज्यात खलनायक दीपिकाच्या पात्राला केस धरून ओढतो.
share
(3 / 6)

या सीनबद्दल सांगताना शाश्वत चॅटर्जी यांनी म्हटले की, 'शूटिंगच्या वेळी दीपिकाच्या चेहऱ्यावर हसू होते. यात एक सीन आहे, जिथे मी तिला केस धरून ओढतो. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा हा शेवटचा दिवस होता. दीपिका गरोदर असल्याने हे चित्रीकरण मुंबईत झाले. त्यावेळी रणवीर सेटवर येऊन उभा राहायचा.’
share
(4 / 6)

रणवीर सिंहचे कौतुक करत शाश्वत चॅटर्जी म्हणाला की, ‘रणवीर खूप सकारात्मक ऊर्जा देतो. तो एका ठिकाणी शांत उभा राहू शकत नाही. तो सीन खूप हिंसक होता, ज्यामुळे मी रणवीरला सांगितले की तू काळजी करू नकोस. अशा दृश्यासाठी बॉडी डबल सेटवर आहेत. यावरही रणवीर सिंह खूप हसला.
share
(5 / 6)

दीपिका पदुकोणने गरोदरपणात ‘कल्की २८९८ एडी’चं शूटिंग तर केलंच, पण त्याचवेळी 'सिंघम अगेन'चं शूटिंगही केलं. या काळातही तिला रणवीरची पूर्ण साथ मिळत राहिली. तर, दुसरीकडे ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज