बॉलिवूड इंडस्ट्री म्हटली की लव्ह अफेअर आणि घटस्फोटासारख्या चर्चा रोजच ऐकायला मिळतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे लग्नानंतरही अफेअर गाजले होते. आधीच विवाहित असताना देखील हे कलाकार बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. विवाहित असतानाही अफेअर केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. चला जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल…
हृतिक रोशन: हृतिक रोशनने सुझान खानशी लग्न केले होते, दोघांनाही मुले आहेत. सुझान खानसोबतच्या लग्नानंतर हृतिक रोशनचे कंगना रनौतसोबत अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला असून, आता अभिनेता सबा आझादला डेट करत आहे.
फरहान अख्तर: फरहान अख्तरने अधुना भवानानीसोबत लग्न केले होते. फरहान अख्तरचे लग्नानंतर अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि श्रद्धा कपूरसोबत अफेअर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सध्या फरहानने अधुनाला घटस्फोट देऊन शिबानी दांडेकरसोबत लग्न केले आहे.
सनी देओल: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने पूजा देओलसोबत लग्न केले होते. पूजासोबत लग्न केल्यानंतरही सनी देओल डिंपल कपाडियाच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे सनी देओलच्या कुटुंबात बराच वाद निर्माण झाला होता.
धर्मेंद्र: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. दोघांना चार मुले होती. लग्नानंतर धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. तर घटस्फोट न घेता, धर्म बदलून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले.
बोनी कपूर: निर्माता बोनी कपूरने मोना सुरीशी लग्न केले होते आणि दोघांना दोन मुले होती. लग्नानंतर बोनी कपूर अभिनेत्री श्रीदेवीच्या प्रेमात पडले आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. नंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केले.