बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. आजवर तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का आमिरचे असे काही सिनेमे आहेत जे सुपर फ्लॉप ठरले आहेत. या चित्रपटांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हे सिनेमे कोणते चला जाणून घेऊया…
महागडे सेट, मोठी स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशन असूनही ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रभावित करू शकली नाही. आमिरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटासाठी 310 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पण कमाई 150 कोटी रुपये होती.
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने 180 कोटी रुपये खर्च केले होते. पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याने या चित्रपटाने देशभरात केवळ 129 कोटींची कमाई केली.
सलमान खानसोबतचा अंदाज अपना अपना हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि विनोदी दृश्ये आवडली नाहीत. पण जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला तेव्हा तो सर्वांना आवडला. आज त्याची गणना क्लासिक कॉमेडी चित्रपटांमध्ये केली जाते.