बॉलिवूडमध्ये हिट होण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरातून आला आहात किंवा कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमीचे आहात, यांची गरज नसते. तुमच्यात टॅलेंट आणि आवड असेल तर, तुम्ही एखाद्या छोट्याशा गावात जन्म घेऊनही मनोरंजनाच्या जगात नाव कमवू शकता. छोट्या शहरातील असे नऊ कलाकार आहेत, ज्यांनी 'हे' सिद्ध केले आहे.
'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरी इतकी लोकप्रिय झाली की, लोक तिला 'नॅशनल क्रश' आणि 'भाभी २' म्हणू लागले. तृप्तीच्या यशाने उत्तराखंडमधील जनता खूप खूश होती. तृप्ती डिमरी ही एक पहाडी मुलगी असून, तिचा जन्म उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे झाला आहे.
कंगना रणौतचे हिमाचल कनेक्शन सर्वांनाच माहीत आहे. तिचा जन्म एका छोट्शा गावात झाला होता, पण तिची स्वप्ने नेहमीच मोठी होती. एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच तिने राजकारणातही प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली शहरात राहणारी प्रियांका चोप्रा आता जागतिक स्तरावर एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. नाव गाजवायचे असेल तर शहर मोठे नाही, स्वप्ने मोठी असली पाहिजेत, हे तिने सिद्ध केले.
यामी गौतम देखील हिमाचलची आहे. तिचा जन्म बिलासपूर येथे झाला होता. तिने स्वत:ला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले आहे.
अभिनेत्यांबद्दल बोलायचे झाले तर, हिंदी चित्रपटसृष्टीला छोट्या-छोट्या ठिकाणाहून अनेक मोठे कलाकार मिळाले आहेत. कार्तिक आर्यन देखील त्यापैकी एक आहे. कार्तिक हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील आहे.
छोट्या शहरांतील प्रतिभावान कलाकारांचा विचार केला, तर नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव कसे सोडता येईल? नवाजचा जन्म उत्तर प्रदेशातील बुढाना शहरात झाला आहे.
रणदीप हुडा हा हरियाणातील रोहतकचा आहे. त्याने ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले. अनेक नोकऱ्या केल्या आणि मग अभिनयाची आवड पूर्ण केली.
पंकज त्रिपाठी उर्फ 'कालिन भैय्या' हे बिहारमधील बेलसंड या छोट्याशा शहरातील आहेत. चित्रपटांपासून ते ओटीटीपर्यंत सर्वत्र त्याने आपले खास स्थान निर्माण केले आहे.