रोंगाली बिहू, ज्याला बोहाग बिहू देखील म्हटले जाते, हा आसामचा सर्वात महत्वाचा सांस्कृतिक सण आहे. हा सण आसामी नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो. हा सण कृषी हंगामाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यावर्षी, रोंगाली बिहू १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे.
(ANI)गुवाहाटीमधील रोंगाली बिहू उत्सवापूर्वी फॅन्सी बाजारामध्ये या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली आहे. या सणामुळे येथील बाजारपेठा फुलल्या आहेत. बिहू हा सण बिशू या शब्दापासून तयार झाला आहे. बिशूचा या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या सणामुळे सगळे नागरिक एकत्र येऊन भोग म्हणजे भोजन करतात. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी नागरिक एकत्र येऊन शेतातील पिकाची कापणी करुन एकत्र पारंपरिक पद्धतीने भोजन करतात.
(ANI)गुवाहाटी, आसाम येथील AEI प्लेग्राउंड, चांदमारी येथे, रोंगाली बिहू उत्सवापूर्वी गुवाहाटी बिहू सन्मिलनने आयोजित केलेल्या 'ढोल बदन कार्यशाळेत' पारंपारिक पोशाख परिधान करून बिहू नृत्य करत असतांना मुली. बिहू हा शब्द दिमासा नागरिकांच्या भाषेतून घेतलेला आहे. दिमासा नागरिकांची देवता ब्राई शिबराई आणि पिता शिबराई असल्याचे हे नागरिक मानतात. त्यामुळे बिहू हा सण शेतीशी निगडीत असलेल्या परंपरेवर आधारित असल्याचे दिसून येते.
(ANI)आसामी अभिनेता गायत्री महंता गुवाहाटीमध्ये रोंगाली बिहू उत्सवापूर्वी आयोजित केलेल्या 'बोर असोम' प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पारंपारिक वाद्य वाजवत आहेत.
(ANI)रोंगाली बिहू हा एक बहु-दिवसीय उत्सव आहे. जो सामान्यत: सात दिवसांचा असतो, प्रत्येक दिवस 'क्षात बिहू' म्हणून ओळखला जातो. या उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम, पारंपारिक विधी आणि मेजवानी यांचा समावेश असतो.
(ANI)आसाममधील नागाव येथे रोंगाली बिहू उत्सवापूर्वी एक कारागीर पारंपारिक ढोल (ढोल) तयार कारण्याच्या कामात व्यस्त असतांना.