महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील अनधिकृत दर्ग्यावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.
राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता.
हे बांधकाम महिन्याभरात हटवले गेले नाही तर, त्याच्या बाजूला गणपतीचे मंदीर बांधू असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.