मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'त्याने माझा केवळ वापर केला', शिल्पा शेट्टीने खासगी आयुष्याविषयी केला होता मोठा खुलासा

'त्याने माझा केवळ वापर केला', शिल्पा शेट्टीने खासगी आयुष्याविषयी केला होता मोठा खुलासा

Jun 08, 2024 09:47 AM IST
  • twitter
  • twitter
  • आज ८ जून रोजी शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
वयाची ४० ओलांडल्यानंतर फिटनेस आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ९०च्या दशकातील अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आज ८ जून रोजी शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
share
(1 / 5)

बॉलिवूड कलाकरांची नावे ही एकमेकांसोबत काम करत असताना जोडली जातात. ९०च्या दशकात शिल्पा शेट्टीचे नाव अभिनेता अक्षय कुमारशी जोडले जात होते. दोघांनी ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण २००० साली त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अक्षयने २००१ साली अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले.
share
(2 / 5)

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये शिल्पाला अक्षयसोबतच्या अफेअरवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा पहिल्यांदाच तिने यावर वक्तव्य केले होते. जेव्हा अक्षय शिल्पा सोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता असा धक्कादायक खुलासा शिल्पाने केला होता.
share
(3 / 5)

अक्षयसोबतच्या अफेअर विषयी सांगताना शिल्पाच्या डोळ्यात पाणी आले होते. ती म्हणाली, ‘अक्षयने केवळ माझा वापर केला. आम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये होतो. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग येतो. कारण त्याने फसवले.’
share
(4 / 5)

त्यानंतर शिल्पाने कधीही अक्षयसोबत काम केले नाही. ती राज कुंद्राशी संसार थाटून वैवाहीक आयुष्यात आनंदी राहण्याचा निर्णय घेतला.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज