सध्या मालदीव वाद प्रचंड चर्चेत आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांची हकालपट्टी देखील झाली आहे. या सगळ्या वादादरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्रीने मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केला आहे.
(All Photos: Instagram)बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री नुकतीच आपल्या कुटुंबासोबत मालदीवला पोहोचली होती.
बिपाशा बसू हिने आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसली आहे.
मात्र, आता बिपाशा बसू सोशल मीडियावर ट्रोल देखील होत आहे. अनेक चाहते बिपाशाच्या या फोटोंवर कमेंट करून तिला बोल लगावत आहेत.
‘मॅडम आतातरी जागरूक नागरिक बना आणि मालदीव नव्हे, लक्षद्वीपमध्ये आपला वाढदिवस साजरा करा’, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स चाहते करत आहेत.