Bigg Boss top 7 controversies: सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉसचा सीझन 18 लवकरच सुरू होणार आहे. हा शो ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक स्पर्धकांची नावे पुढे आली आहेत. हा शो नेहमीच वादांसाठी ओळखला जातो. चला तर मग एक नजर टाकूया बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या वादांवर…
बिग बॉस 5 ची स्पर्धक पूजा मिश्रा खूप चर्चेत होती. शोदरम्यान पूजाची इतर स्पर्धकांसोबतची भांडणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पूजाच्या मारामारीमुळे केवळ स्पर्धकच नाही तर सलमान खानही नाराज झाला होता.
फॅशन डिझायनर इमाम सिद्दीकीने बिग बॉस 6 च्या घरात आपल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. इमामने केवळ आश्का गोदरियाला घाबरवण्याचा प्रयत्न केला नाही तर सलमानसोबतही वाद घातला होता.
बिग बॉस 7 चा स्पर्धक अरमान कोहलीवर अभिनेत्री सोफिया हयातने मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर अरमान कोहलीची शोमधून हकालपट्टी तर झालीच पण तुरुंगातही पाठवण्यात आले. मात्र, नंतर त्याला जामीन मिळाला.
प्रियांका जग्गा बिग बॉस 10 चा भाग होती. शो दरम्यान प्रियांकाने स्पर्धकांशी फक्त भांडणच केले नाही तर त्यांना शिवीगाळही केली. या कृतीमुळे सलमाननेच तिला घराबाहेर काढले होते.
स्वामी ओम बिग बॉस 10 मध्ये सहभागी झाले होते. त्याने या शोमध्ये गुरू म्हणून प्रवेश केला होता, पण त्याच्या कृत्यांमुळे तो चर्चेत राहिला. स्वामी ओमने घरातील स्पर्धकांच्या अंगावर लघवी फेकून हद्द पार केली होती.
अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या अनेक सीझनमध्ये दिसली आहे. राखीने एकदा स्वत:च्या कॉफीमध्ये थुंकले होते जेणेकरून ती कोणी पिऊ नये, मीडियाशी बोलताना तिने सांगितले होते की, ती घरी सॉक्समध्ये अन्न लपवून ठेवले होते.