यावेळी रिॲलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धक या खेळामध्ये पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि दरम्यान, शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून कोण येणार? यावर वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.
‘बिग बॉस ओटीटी ३’साठी शहजादा धामीचे नाव खूप चर्चेत होते. परंतु, घरात एन्ट्री केलेल्या स्पर्धकांच्या यादीमध्ये तो दिसला नाही. आता शोच्या वाईल्ड कार्डसाठी निर्मात्यांनी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.
ठगेश उर्फ सागर ठाकूर हा यूट्यूबच्या जगातला एक प्रसिद्ध चेहरा आहे. यावेळी शोमध्ये त्याच्या एन्ट्रीबद्दल खूप चर्चा झाली, परंतु, तो या स्पर्धेचा भाग बनला नाही. आता तो वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये येतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ब्रिस्टी समद्दारने देखील तिच्या एका ट्रीपदरम्यान ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये येण्याबद्दल बोलून चाहत्यांना उत्साहित केले आहे.
राखी सावंतचे बिग बॉसशी जुने नाते आहे आणि ती या आधीही काही सीझनमध्ये दिसली आहे. ती कदाचित यावेळी बिग बॉस ओटीटीमध्ये येऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
‘थारा भाई जोगिंदर’ या नावाने प्रसिद्ध असलेले जोगिंदर यादव सध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. या शोमध्ये त्याला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळण्याचीही शक्यता आहे.