Bigg Boss Marathi: घरातील स्पर्धक सतत चुका करत आहेत. बिग बॉसने त्यांना या चुकीची चांगलीच शिक्षा दिली आहे.
(1 / 5)
दोन वर्षांपासून रखडलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिझनमध्ये थोडा वेगळेपणा आहे. कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर घरात असल्याचे पाहायला मिळत आहे. पण स्पर्धक सतत करत असलेल्या चुकांमुळे बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आहे.
(2 / 5)
बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सतत काही ना काही चुका करत आहेत. कोणी दिवसा झोपत आहे तर कुणी माईक विसरत आहेत. तसेच घरात इंग्रजी भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे बिग बॉस वैतागले आहेत.
(3 / 5)
बिग बॉसने स्पर्धकांना मोठी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट पहिल्या आठवड्यातील कॅप्टनसी टास्कच काढून काढला आहे.
(4 / 5)
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात न घडलेली गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे. तेही पहिल्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कच होणार नाही. स्पर्धकांना ऐकूनच धक्का बसला.
(5 / 5)
जेव्हा स्पर्धकांना घरात कॅप्टनसी टास्क होणार नसल्याचे कळताच धक्का बसतो. ते एकमेकांच्या चूका दाखवायला लागतात. निक्की तांबोळी आणि तिचा मित्र परिवार हा वर्षा उसगावकर यांना दोषी ठरवतात.