'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. आता आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना निर्णय घेण्यात कमी असलेल्या तीन सदस्यांची नावे सांगायला लावली. सदस्यांनी सर्वानुमते सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेतली. पण आजच्या भागात याच तीन सदस्यांना 'बिग बॉस'ने निर्णय घ्यायला लावला असल्याचं पाहायला मिळणार आहे.
इरिना, सूरज आणि धनंजय यांना 'बिग बॉस' त्यांच्याकडे असलेल्या बीबी करन्सीमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि राशन विकत घ्यायला सांगतात. दरम्यान डीपी म्हणजेच धनंजय पोवार म्हणतो,"आपल्याला चना डाळ आणि मूग डाळ तर घ्यावं लागेल." त्यावर इरिना म्हणते,"सगळचं घ्या... निर्णय घेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे."
इरिना आणि धनंजयच्या संभाषणावर सूरज म्हणतो,"आता माझं डोकं पिकायला लागलंय." तर धनंजय म्हणतो,"माझं फुटलं." यावर सूरज पुढे म्हणतो,"तुझं फुटलंय माझं तुटेल."