‘बिग बॉस मराठी’ या शोचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता लवकरच हा शो सुरू होणार असून, अभिनेता रितेश देशमुख या शोचे होस्टिंग सांभाळणार आहे. तर, ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्याची आतुरता वाढली आहे. नुकतीच या खेळात सहभागी होणाऱ्या काही कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र, यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
कोकण हार्टेड गर्ल: युट्युबर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर ही ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. कोकणातील कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ती सध्या करत आहे.
चेतन वडनेरे: ‘लेक माझी लाडकी’, ‘अल्टी पलटी’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिकांमधून मुख्य भूमिकांमध्ये झळकलेला अभिनेता चेतन वडनेरे हा देखील ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये दिसंणार असल्याची चर्चा आहे. आता तो ‘बिग बॉस मराठी’ देखील गाजवू शकतो, असे म्हटले जात आहे.
विवेक सांगळे: अभिनेता विवेक सांगळे याने आपल्या दमदार अभिनयाने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकं गाजवली आहेत. नुकतीच त्याची ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका ऑफ एअर गेली आहे. यानंतर तो कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसलेला नाही. त्यामुळे आता तो ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये दिसू शकतो.