मराठी मनोरंजनाचा राजा म्हणून अभिनेता पॅडी कांबळे ओळखला जातो. आता त्याची बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री झाली आहे. त्याला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अभिनेत्री योगिता चव्हाण ही जीव माझा गुंतला या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ती आता बिग बॉसच्या घरात काय गेम खेळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
भाग्य दिले तू मला मालिकेत सानियाची भूमिका साकारणी जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात दिसत आहे.
इंडियन आयडल जिंकलेला गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.
नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेत आहे. त्याच्याशी बोलण्यासाठी शोचा सूत्रसंचालक रितेश देशमूख चक्क गुडघ्यावर बसला आहे.
अभिनेत्री इरिना रुडिकोवा ही अंतरराष्ट्रीय कलाकार आहे. ती एक उत्तम डान्सर आहे, तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता इरिना बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
मॉर्डन आणि टेक्नो सेवी असणारे नव्या युगाचे कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात एण्ट्री झाली आहे. पुरुषोत्तम हे रायगडमध्ये मठाधीपती म्हणून प्रसिद्ध आहेत.