दरवर्षी प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात नेहमीच मारामारी पाहायला मिळते. पण, याच घरात काही स्पर्धक प्रेमात पडल्याचे देखील पाहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात अनेक कलाकारांच्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात असतात. यातील काही नाती घराबाहेर पडल्यानंतरही कायम राहतात, तर काही नाती रिॲलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर लगेच संपतात. चला जाणून घेऊया अशाच जोड्यांबद्दल…
‘बिग बॉस सीझन ७’मध्ये दिसलेले गौहर खान आणि कुशल टंडन या शो दरम्यान प्रेमात पडले होते. शो दरम्यान गौहर आणि कुशल हे एकमेकांवरील प्रेम दाखवण्यात कधीच मागे हटले नाही. मात्र, रिॲलिटी शोनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. कुशल टंडनने स्वतः ब्रेकअपची माहिती दिली होती.
‘बिग बॉस सीझन ७’मध्ये तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्यातही प्रेम प्रकरण पाहायला मिळाले होते. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले होते की, त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, शोमधून बाहेर आल्यानंतर लगेचच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.
‘बिग बॉस सीझन १३’मध्ये दिसणारे पारस छाबरा आणि माहिरा यांच्यात जवळीक होती. दोघेही घरातून बाहेर आल्यानंतरही एकमेकांना डेट करत होते. मात्र, जवळपास चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.
‘बिग बॉस सीझन ४’मध्ये अश्मित पटेल आणि वीणा मलिक ही जोडी देखील त्यांच्या जवळीकीमुळे चर्चेत होती. दोघांनीही घरात एकमेकांचे चुंबन घेतले होते. दोघेही घरात असताना त्यांच्यात खूप जवळीक पाहायला मिळाली. मात्र, घराबाहेर पडल्यानंतर दोघेही वेगळे झाले.
‘बिग बॉस १४’च्या घरात दिसणारे पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांच्यात प्रेम सुरू झाले. घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांचेही नाते सुरळीत सुरू होते. दोघांनी लग्नाचाही बेत आखला होता. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.