‘बिग बॉस १८’ हा शो खूप पसंत केला जात आहे. या शोमध्ये दररोज होणाऱ्या कोलाहलामुळे शोलाही चांगला टीआरपी मिळत आहे.
(instagram)आता Ormax ने बिग बॉस १८च्या ‘टॉप ५’ सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांची यादी जारी केली आहे, ज्यांना भारतीय प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
(instagram)ही यादी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत प्रसिद्ध झाली असून, ही यादी समोर आल्यानंतर काही चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
(instagram)या शोमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरला तो रजत दलाल. शोच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला रजत दलाल सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
(instagram)यानंतर लोकप्रिय टीव्ही अभिनेता विवियन डिसेना दुसऱ्या स्थानावर आहे. विवियनला या शोमध्ये खूप पसंत केले जात आहे.
(instagram)सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत चाहत पांडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शोमध्ये चाहतलाही भरपूर पसंती मिळत आहे.
(instagram)अभिनेत्री श्रुती अर्जुन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तसे, पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना श्रुतिका खूपच मनोरंजक वाटत आहे.
(instagram)