यावेळी अनेक प्रसिद्ध चेहरे बिग बॉस १८मध्ये सहभागी झाले आहेत. या यादीत अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या नावाचाही समावेश आहे. शिल्पा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा 'हम', 'खुदा गवाह', 'आँखे', 'गोपी किशन', 'बेवफा' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. शिल्पा जितकी प्रसिद्धीच्या झोतात राहते तितकी तिची मुलगी यापासून लांब दिसते. आज आम्ही तुम्हाला शिल्पाच्या मुलीविषयी सांगणार आहोत.
शिल्पा शिरोडकरने 2000 मध्ये अप्रेश रणजीतशी लग्न केले. शिल्पा आणि रंजीत यांना अनुष्का रंजीत नावाची मुलगी आहे.
अनुष्का २१ वर्षांची आहे. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. अनुष्का ही आई आणि काकूपेक्षा वेगळी आहे. तिला लाइमलाइटपासून लांब रहायला आवडते.
अनुष्काचे अनेक फोटो पाहून चाहते तिला तिची आई शिल्पाची झेरॉक्स कॉपी म्हणत आहेत. एका यूजरने तर या फोटोवर कमेंट करत, ‘ही तर आईची झेरॉक्स कॉपी’ असे म्हटले आहे.
अनुष्का अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.
अनुष्काने 2021 मध्ये नॉर्थ लंडन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. सध्या ती स्कॉटलंडमधून पुढील शिक्षण घेत आहे.