
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूची बहिण, अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८९ साली तिने करिअरला सुरुवात केली होती. आता तिचे हे सिनेमे कोणते आणि कुठे पाहाता येतील चला जाणून घेऊया…
शिल्पाने आपल्या करिअरमध्ये मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रेखा आणि माधुरी यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे
भ्रष्टाचार हा चित्रपट 1989 साली आला होता. या चित्रपटाद्वारे शिल्पाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शिल्पासोबत मिथुन चक्रवर्ती, रेखा आणि अनुपम खेर दिसले होते. चित्रपटाचे IMDb रेटिंग ४.८ आहे. तुम्हाला हा चित्रपट पहायचा असेल तर तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
मृत्युदंड या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले होते. पितृसत्ताक समाजाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे फाशीची शिक्षा झालेल्या तीन महिलांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात शिल्पासोबत शबाना आझमी आणि माधुरी दीक्षित दिसल्या होत्या. चित्रपटाचे IMDb रेटिंग ७.१ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
रघुवीर हा चित्रपट १९९५ साली आला होता. या चित्रपटात शिल्पासोबत सुनील शेट्टी दिसला होता. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट होता. चित्रपटाचे IMDb रेटिंग ४.६ आहे. तुम्ही तो जिओ सिनेमावर पाहू शकता.
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या आँखे या चित्रपटात गोविंदा, चंकी पांडे आणि कादर खान दिसले होते. या चित्रपटाचे IMDB रेटिंग ६.८ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
१९९४ मध्ये रिलीज झालेल्या गोपी किशन या चित्रपटात शिल्पासोबत सुनील शेट्टीही दिसला होता. या चित्रपटात सुनील शेट्टीची दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.





